मनसेचे कोकण संघटक आणि जिल्हा उपाध्यक्षांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनसेचे कोकण संघटक आणि जिल्हा उपाध्यक्षांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

वैभव खेडेकर आणि विश्वास मुधोळे या दोघांनी खेड जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जाबाबत 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 12 जुलै- महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे आणि उपअभियंता प्रकाश गायकवाड यांना जगबुडी नदीच्या पुलाच्या रेलिंगला बांधून धक्काबुकी केल्या प्रकरणी खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मुधोळे यांची सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांची रत्नागिरी येथील जिल्हा विशेष कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

वैभव खेडेकर आणि विश्वास मुधोळे या दोघांनी खेड जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जाबाबत 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरूद्ध सरकार कडक कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहे. आमदार नितेश राणे यांचं प्रकरण ताजं असतानाच आता खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनाही अशाच एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. खेड सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तर लोकहितासाठी असे अनेक खटले अंगावर घेऊ, असा इशारा मनसेने यावेळी दिला होता. या प्रकरणी वैभव खेडेकर यांच्यासह आणखी दोन जणांना खेड पोलिसांनी अटक केली होती.

पुलाच्या रेलिंगला अभियंत्यांना बांधलं होतं..

महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बामणे आणि प्रकाश गायकवाड यांना खेडमधील जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या रेलिंग बांधण्यात आलं होतं. हे अधिकारी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरुद्ध पाऊल उचलण्यात आल्याचा खेडेकरांनी दावा केला होता. मात्र, कायदा हातात घेतल्याने ही कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दापोली उपकारागृहाच्या बाहेर एकच गर्दी केली होती. जनतेच्या हितासाठी काम करत असताना असे 100 गुन्हे देखील आम्ही अंगावर घेऊ असे वैभव खेडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी बोलताना जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व दापोली नगर पंचायतीचे माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी सरकार 353 कलमाचा गैरवापर करत असल्याचा आणि दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

VIDEO:धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी

First published: July 12, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading