Home /News /maharashtra /

दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील 'या' 6 मालमत्ता विक्रीला, सर्वात मोठा लिलाव असल्याची चर्चा

दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील 'या' 6 मालमत्ता विक्रीला, सर्वात मोठा लिलाव असल्याची चर्चा

आतापर्यंतच्या लिलावापैकी हा सर्वात मोठा लिलाव मानला जात आहे.

खेड, 17 ऑक्टोबर : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके़ आणि खेड शहर तसंच तालुक्यातील लोटे येथील विविध मालमत्तांचा लिलाव येत्या 10 नोव्हेंबरला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तस्करी आणि विदेशी विनिमय हाताळणी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या लिलावापैकी हा सर्वात मोठा लिलाव मानला जात आहे. या मालमत्तांचा होणार लिलाव जमीन - राखीव किंमत 27 गुंठा - 2 लाख 5 हजार 800 29.30 गुंठा - 2 लाख 23 हजार 300 24.90 गुंठा - 1 लाख 89 हजार 800 20 गुंठा - 1 लाख 52 हजार 500 18 गुंठा - 1 लाख 38 हजार 30 गुंठा जमिनीवर असलेले घर - 6 कोटी 14 लाख 8 हजार 100 केंद्र सरकारने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करताना 2018 साली त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास सुरू केला होता. त्यानुसार मुंबईतील मालमत्तेचा लिलाव पहिल्यांदा करण्यात आला होता. या लिलावात मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती. सुमारे 3.51 कोटी रुपयांस या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. सैफ बुरहानी अपल्फिमेंट ट्रस्टने या जागेसाठी सर्वाधिक बोली लावली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 10 नोव्हेंबरला दाऊदच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जवळपास 6 मालमत्तांचा लिलाव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात येणार आहे. रत्नागिरी येथील मुंबाके गावात ही मालमत्ता असून या ठिकाणी दाऊदच्या नावावर अनेक जमिनी आणि घर असल्याचे सांगण्यात आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Dawood ibrahim

पुढील बातम्या