खेड, 21 नोव्हेंबर : अलिकडील काळात अनेक कामे ऑनलाईन होऊ लागल्याने वेळ आणि श्रम कमी होऊ लागले आहेत. मात्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. खेड शहरातील पाटीदार भवनजवळ कृष्णकुंज इमारतीत राहणारे विजय पवार यांची ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना 51 हजार रुपयाची फसवणूक अज्ञात इसमाने केल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
खेड शहरातील पाटीदार भवन जवळ कृष्णकुंज इमारतीत राहणारे पवार यांनी 'बाय माय मोबाईल' या कंपनीच्या वेबसाईटवर फोन करून नवीन मोबाईल फोनच्या खरेदी करता चार हजार 199 रुपये कंपनीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना एक लिंक पाठवली व लिंक वरील फॉर्म भरण्यास सांगितले.
हेही वाचा - भयंकर! Video Game खेळू न दिल्यानं तरुणानं आपल्या आई-वडिलांना चाकूनं भोकसलं
त्याप्रमाणे विजय पवार यांनी फॉर्म भरून पाठवल्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय व बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील 46 हजार रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले. त्यामुळे पहिले भरलेले व काढून घेतलेले असे 51 हजार रुपयांची फसवणूक झाली. याबाबत खेड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.