रत्नागिरी, 22 जुलै: खेडमध्ये (Khed) सलग ढगफुटी प्रमाणे पाऊस (Rain) पडत असल्याने खेड शहरात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेले असून शेकडो दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. (Ratnagiri)
या पावसात जगबुडी नदीचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. 10 मीटरपेक्षा अधिक पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. मध्यरात्री पुराचे पाणी शहरात शिरल्यानं अनेक व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
खेडमध्ये सलग ढगफुटी प्रमाणे पाऊस पडत असल्याने खेड शहरात पूर pic.twitter.com/sHkmXBAL18
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
खेड- दापोली राज्य मार्गासह अनेक अंतर्गत मार्ग बंद झालेत. तर खाडी पट्ट्यातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री पासून तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत आहे. विजांच्या कडकडटासह अति मुसळधार पाऊस कोसळतोय.
खेड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली , शेकडो दुकानांमध्ये शिरले पुराचे पाणी pic.twitter.com/4xHiIm9dAB
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
खेड शहरातील सफा मशीद चौक, पानगल्ली, गांधी चौक, साठे पोत्रिक मोहल्ला, बाजारपेठ, निवाचा तळ, तीन बत्ती नाका, तळ्याचे वाकण परिसर पाण्याखाली गेले आहेत. शहरातील नागरिक घाबरले असून प्रशासनातर्फे घरातून बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यभरात वादळी पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद या भागात येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.