लढत विधानसभेची : खेड-आळंदीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत

लढत विधानसभेची : खेड-आळंदीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत

शिरुर लोकसभेत झालेल्या मतदानामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातली राजकीय गणितं बदलणार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं 15 वर्षांचं वर्चस्व मोडून शिरुरच्या लोकसभेची जागेवर डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. आता त्यांच्या निमित्ताने खेड आळंदी मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे.

  • Share this:

पुणे, 18 सप्टेंबर : शिरुर लोकसभेत झालेल्या मतदानामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातली राजकीय गणितं बदलणार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं 15 वर्षांचं वर्चस्व मोडून शिरुरच्या लोकसभेची जागेवर डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. आता त्यांच्या निमित्ताने खेड आळंदी मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे.

या मतदारसंघात चाकण औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी कंपन्या आहेत. त्यामुळे इथे बाहेरून येऊन स्थायिक झालेले नोकरदार आहेत. निमशहरी शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

हा मतदारसंघ झाल्यानंतर 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते आमदार झाले. पण मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहितेंचा पराभव झाला आणि शिवसेनेचे सुरेश गोरे इथे विजयी झाले.

या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाचं हिंसक आंदोलन, त्याआधीचं बैलगाडा शर्यतीसाठी झालेलं आंदोलन आणि वाहतूक कोंडी फोडताना विद्यमान शिवसेना आमदारांकडून रिक्षाचालकाला झालेली मारहाण यामुळे ही निवडणूक युतीला कठीण जाण्याची चिन्हं आहेत.

खेड आळंदी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळालं. हीच गणितं कायम राहिली तर इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकू शकतो. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या मोहितेंवर गुन्हा दाखल करण्याची खेळीही आखली गेली. पण आता मतदार या राजकारणाला कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत खेड-आळंदी विधानसभेतलं मतदान

शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 92 हजार 138

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 99 हजार 583

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

सुरेश गोरे, शिवसेना- 1 लाख 32 हजार 7

दिलीप मोहिते, राष्ट्रवादी- 70 हजार 489

======================================================================================

VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा

First published: September 18, 2019, 8:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading