खामगाव नगरपालिकेत राष्ट्रध्वजाचा अवमान, साडेसात वाजेपर्यंत झेंडा उतरवलाच नाही!

खामगाव नगरपालिकेत राष्ट्रध्वजाचा अवमान, साडेसात वाजेपर्यंत झेंडा उतरवलाच नाही!

साडेसात वाजल्यानंतरही तिरंगा झेंडा फडकत असल्याची घटना घडली असून यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा प्रकार दिसून येत आहे.

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा, 21 फेब्रुवारी : शासकीय इमारतीवर दररोज झेंडा फडकवावा, अशी संहिता आहे. त्यानुसार खामगाव नगरपालिकेवर दररोज तिरंगा झेंडा फडकवला जातो आणि सायंकाळी सन्मानपूर्वक तो उतरवले जातो. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजल्यानंतरही तिरंगा झेंडा फडकत असल्याची घटना घडली असून यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा प्रकार दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिकेमध्ये दररोज राष्ट्रध्वजाला सलामी देऊन तिरंगा झेंडा फडकवला जातो. यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून झेंडा फडकवणे आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी विहित वेळेवर सन्मानपूर्वक उतरविणे यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावलेली आहे. यामध्ये दररोज झेंडा फडकवणे आणि सायंकाळी सन्मानपूर्वक उतरविणे हे कार्य नित्याचेच आहे. मात्र आज शुक्रवारी सायंकाळचे सात वाजले असतानासुद्धा नगरपालिकेच्या इमारतीसमोर झेंडा फडकत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाहता पाहता ही घटना संपूर्ण शहरात पसरली आहे.

खामगावचे उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर सर्व सूत्रे हलवून झेंडा उतरविण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आणि सदर कर्मचारी हा सायंकाळी साडेसातच्या दरम्यान नगरपालिका इमारतीमध्ये पोहोचून त्यांनी झेंडा खाली उतरविला. विशेष म्हणजे झेंडा खाली उतरविण्याची पद्धतही तिरंगा झेंड्याच्या अवमान करणारी होती.

झेंडा उतरवता असताना सदर कर्मचाऱ्याने झेंड्याला सलामी न देता, तसंच राष्ट्रगीत न गाता झेंडा उतरवला. यावर भरीस भर म्हणून झेंडा हात घेऊन सन्मानपूर्वक घडी न करता तो हातात घेऊन चालतात चालता घडी त्याने केली. आपल्याकडून चूक झाली, आपण विसरलो होतो, अशी गयावया त्याने नागरिकांसमोर केली. प्रवीण नावाच्या या शिपायाने केलेल्या या प्रकाराला मुख्याधिकारी बोरीकर जबाबदार असल्याचा सूर नागरिकांमध्ये होता. या प्रकरणी अद्यापपर्यंत कुणीही पोलिसात तक्रार केलेली नव्हती. मात्र ड्युटी असलेल्या शिपायाला तातडीने निलंबित केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

काय आहे धवज संहिता ?

ध्वज संहितेनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना आणि उतरवताना बिगूल वाजवलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा आणि ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. यावेळी सलामी देऊन राष्ट्रगीत होणे आवश्यक आहे.

First published: February 21, 2020, 9:51 PM IST
Tags: Buldana

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading