खडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार!

खडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार!

खडकवासला धरण 91टक्के भरले असून उद्या सकाळी (सोमवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोड्‌ण्यात येणार आहे.

  • Share this:

पुणे, ता. 15 जुलै :  खडकवासला धरण 91टक्के भरले असून उद्या सकाळी (सोमवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोड्‌ण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दम्यान खडकवासला धरणसखळीतील पाणीसाठा 16.29 टीएमसी (55 .89 टक्‍के) झाला आहे. शहराला पुढील वर्षभर पुरेल एवढे हे पाणी आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जागीच ठार

VIDEO : मोडक सागर व्होवरफ्लो, दोन दरवाजे उघडले

दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतील धरणांचा पाणी साठा रविवारी सकाळी 15.47 टीएमसी (53.10) टक्के होता. या साठयात वाढ होऊन सायंकाळी 5 वाजता हा साठा 16.29 टीएमसी (55.89 टक्के ) झाला आहे. त्यात खडकवासला धरण 91 टक्के भरले असून या धरणात 1.80 टीमसी पाणीसाठा आहे. या धरणाची साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे.

'पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात'

‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ होत आहे. या धरणातही रविवारी सायंकाळी 7.52 टीएमसी ( 71 टक्के) पाणीसाठा झाला आहे. तर वरसगाव धरणातील पाणीसाठा 5.37 टीएमसी ( 42 टक्के) झाला असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 1.60 ( 43 टक्के) झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणांचा पाणीसाठा सुमारे 10.06 टीएमसी होता, या साठयाच्या तुलनेत यंदा जुलै मध्येच 6 टीएमसी अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये भुस्खलन, 7 जण ठार,30 जखमी

मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अतिदक्षतेचे इशारा 

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडत असल्याने सोमवार 16 जुलै रोजी सकाळी 8 वाजता पासून 2000 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. मुठा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे

असा अतिदक्षतेचे इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

First published: July 15, 2018, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading