ठाणे, 18 मे : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली असून तिला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, तिने जो मेसेज फेसेज पोस्टवर शेअर केला होता, तो कुणी तरी पाठवला अथवा एखाद्या ग्रुपवरून आला होता, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यता आहे. यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तीने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती याचा पोलीस तपास करणार आहे. कारण पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत.
(Video : काही सेकंदात पत्त्यासारखा वाहून गेला लोखंडी ब्रिज; पावसाचं रौद्र रूप )
दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केतकी चितळेकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.
(इंद्राणीची लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री! जन्मदात्या आईने का घोटला गळा?)
केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.
केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ?
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.