मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Keshav Upadhye vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केशव उपाध्येंची जहरी टीका, म्हणाले पेंग्विनसेना प्रमुख…

Keshav Upadhye vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केशव उपाध्येंची जहरी टीका, म्हणाले पेंग्विनसेना प्रमुख…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल(दि.21) भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यानिमीत्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून आले. (Keshav Upadhye vs Uddhav Thackeray)

  मुंबई, 22 सप्टेंबर : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल(दि.21) भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यानिमीत्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून आले. (Keshav Upadhye vs Uddhav Thackeray) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुखांचा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला; दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे राज्यप्रमुखांचा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले.

  या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका करत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

  केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हणाले कि, पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाहीये. अमित शाह हे गरुड आहेत. किमान तेवढा तरी फरत पहा अशा शब्दात टीका केली आहे. तर दुसरीकडे मनसेकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. याचबरोबर भाजप नेते प्रविण दरेकर, यांच्यासह अन्य नेत्यांनी टीका केली आहे.

  उद्धव ठाकरे यांनी महिनाभरात पालिका निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान भाजपला दिले तसेच दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार, याचा पुनरुच्चार केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने भाजपवरच राहिला. त्यांनी राज ठाकरे यांना 'मुन्नाभाई' नावाने हिणवले. तर मी सर्वसामान्य माणसांतील मुख्यमंत्री आहे. कुणी कितीही टीका करोत, मी माझे विकासाचे काम करत राहणार, असे शिंदे म्हणाले.

  मनसेची जोरदार टीका

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व गटप्रमुख, कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलं.

  हे ही वाचा : महाराष्ट्रावर ‘ईडी’च्या लुटारू फौजा म्हणून गुंतवणूकदारांची पळापळ सुरू, शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

  यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची होती. खुर्चीवर संजय राऊत यांचं नाव लिहिलेलं होतं. राऊत सध्या पत्रा चाळ संबंधित आरोपांप्रकरणी आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची खुर्ची रिकामी होती. त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. तर दुसरीकडे मनसेकडून त्याच खुर्चीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: BJP, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या