महाराष्ट्राचा महासंग्राम : केजमध्ये मुंदडांचा वारसा पुढे नेणार का?

महाराष्ट्राचा महासंग्राम : केजमध्ये मुंदडांचा वारसा पुढे नेणार का?

केज विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा नमिता मुंदडा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपकडून संगीता ठोंबरे यांच्याच नावाची चर्चा पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सुद्धा बहुजन वंचित आघाडीकडे तिकिटासाठी मागणी केली आहे.

  • Share this:

बीड, 19 सप्टेंबर : केज हा बीड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ. 1990 पासून 2009 पर्यंत या मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस कडून सलग पाच वेळा निवडून गेल्या होत्या.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये केज विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा नमिता मुंदडा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपकडून संगीता ठोंबरे यांच्याच नावाची चर्चा पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सुद्धा बहुजन वंचित आघाडीकडे तिकिटासाठी मागणी केली आहे.

2012 साली डॉक्टर विमल मुंदडा यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या केज विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज साठे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं आणि या निवडणुकीमध्ये 2012 साली पृथ्वीराज साठे हे मुंदडा गटाकडून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.

सलग पाच वेळा आमदारकी घरात असलेल्या मुंदडा कुटुंबीयांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र आमदारकीपासून फारकत घ्यावी लागली. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संगीता ठोंबरे या भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवार म्हणून पुढे आल्या. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून विमल मुंदडा यांच्या सूनबाई आणि अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं.

महाराष्ट्राचा महासंग्राम : भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे यांना एक लाख सहा हजार 834 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवख्या उमेदवार असलेल्या नमिता मुंदडा यांना 64113 मतं मिळाली. दुसर्‍यांदा विधानसभा निवडणूक लढविणार्‍या संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघातून तब्बल चाळीस हजार मतांनी निवडून आल्या.

केज विधानसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना 1 लाख 16 हजार तर होमपिच असलेल्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना 95 हजार 293 मतं पडली. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात भाजपाला वीस हजार मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजार मतं मिळाली.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

संगीता ठोंबरे, भाजप - 1 लाख 6 हजार 834

नमिता मुंदडा - 64 हजार 113

=================================================================================================

VIDEO: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

First published: September 19, 2019, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading