मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पलटन वाढवू नका, साहेब एका आपत्यावर थांबले' अजितदादांची तुफान फटकेबाजी

'पलटन वाढवू नका, साहेब एका आपत्यावर थांबले' अजितदादांची तुफान फटकेबाजी


'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही.

'सगळ्यांनी कौतुक केलं इमारत खूप चांगली आहे. पण, इमारत ही अजिबात काही चांगली नाही.

'रस्त्याने येताना मला बऱ्याची हरणं पाहण्यास मिळाली. त्यामुळे दिसल्या हरली म्हणून मारायला जाऊ नका. नायतर जेलमध्ये चिक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागले'

बारामती, 28 ऑगस्ट : '50 वर्षापूर्वी शरद पवार साहेब एका आपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की एका आपत्यावर थांबा पण दोन आपत्यावर थांबा पण पलटन वाढवू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या स्टाईलने कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी अजितदादांची फटकेबाजी पाहण्यास मिळाली.

'रस्त्याने येताना मला बऱ्याची हरणं पाहण्यास मिळाली. त्यामुळे दिसल्या हरली म्हणून मारायला जाऊ नका. नायतर जेलमध्ये चिक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागले. एकतर म्हणालं दादा आम्ही खात नाही, पारधी कुटुंब आहे, ते मारून सात दिवस सुकवून सुकवून खातात. कोण सुकवून खातं देव जाणे. पारधी समाजाला खावटी कीट आपण वाटप केल्या आहे, त्यांनाही समाजात जगण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानला झाला मोठा फायदा!

तसंच, पलटन अजिबात वाढू देऊ नका. कुटुंब मर्यादित ठेवा. आपलं दोन मुलं-मुलगी असं काही किंवा काहीही असलं पाहिजे त्यामुळे दोनवर थांबणं शिका, साहेब,  50 वर्षांपूर्वी एका आपत्यावर थांबले. मी म्हणणार नाही की तुम्ही एकावर थांबा पण दोघांवर थांबा पण कुटुंब नियोजन करा, असा खोचक सल्ला अजित पवारांनी दिला. त्यामुळे  उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची  त्यांनी बारकाव्याने पाहणी केली.

पुण्यात तब्बल 5 कोटी किंमतीचं तरंगतं सोनं जप्त, असं काय हे प्रकरण?

यावेळी अजित पवार यांनी चक्क एका रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला. बारामतीच्या पियाजिओ कंपनीने इलेक्ट्रीक रिक्षा तयार केली आहे. आज अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. या भेटीच्या वेळी अजितदादांनी इलेक्ट्रीक रिक्षाची चक्कर मारली. अजित पवारांच्या या  रिक्षा ट्रायलमुळे उपस्थित सर्वच अवाक झाले.

First published:

Tags: Baramati