मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्या देवळात देव नाही.. प्रतिशिवसेना भवनावरुन केदार दिघेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ज्या देवळात देव नाही.. प्रतिशिवसेना भवनावरुन केदार दिघेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभे करण्यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभे करण्यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभे करण्यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  शिर्डी, 17 ऑगस्ट : शिवसेना पक्षावर दावा सांगितल्यानंतर आता शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या चर्चा होत आहे. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आज शिर्डीत साईदर्शनाला हजेरी लावली. यावेळी प्रतिशिवसेना भवनावरुन दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ज्या देवळात देव नाही तीथे कुणाची श्रद्धा असणार? असं म्हणत एकनाथ शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभारण्याच्या निर्णयावर केदार दिघे यांनी टिका केली. शिवसेना नेते केदार दिघे यांनी आज साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर केदार दिघे साई चरणी नतमस्तक झाले. आनंद दिघेंप्रमाणे माझ्या हातून लोकांची सेवा घडावी अशी प्रार्थना साई चरणी केली असून मी दिघे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेबांचे कडवट विचार माझ्या रक्तात असल्याचं दिघे यांनी म्हटलं आहे. देव असल्याशिवाय देवळाला महत्त्व नाही : केदार दिघे देवळात देव राहिल्याशिवाय त्या देवळाला महत्त्व येत नाही. बाळासाहेबांनी सेना भवनाची वीट रचली त्यामुळे तिकडे लोक आस्थेने येतात. वेगळं नाव देऊन काहीही रचले तरी सेनाभवन आणि मातोश्रीचे महत्त्व तेच राहाणार असल्याचं केदार दिघे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची आणि शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांनंतर सर्वसामान्य शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास असून यापुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर विश्वास ठेवूनच शिवसेना पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  दिल्लीत आता फडणवीसांची हवा, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी, गडकरींचं नाव वगळलं!

  शिवसेना आणि शिवसैनिक जिथे आहे तिथेच आहेत. शिवसेना आणि शिवसैनिकांना संघर्ष नवीन नाही, त्यामुळे व्यासपीठावरून दहा जरी गेले तरी समोरील लाखो करोडो जनता शिवसेनेशी बांधिल असल्याचं केदार दिघे यांनी म्हटलं. धर्मवीर हा एक व्यावसायिक चित्रपट असून दिघे साहेब फक्त तीन-चार लोकांमध्ये वावरले नाहीत. दिघे साहेबांनी जवळ घेतल्याने अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला असून दिघे साहेबांचे चरीत्र फक्त तीन तसाचे असू शकत नाही. त्यांचा जीवनपट रेखाटायचा तर त्यावर सिरीज ऑफ इव्हेंट कराव्या लागतील. कारण अनेकांनी खारीचा वाटा उचलला आहे. सर्वांना एकत्र करून खरा जीवनपट बनवला पाहिजे, असं म्हणत धर्मवीर चित्रपटाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shivsena

  पुढील बातम्या