मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /28 नोव्हेंबरनंतर फक्त कल्याण डोंबिवलीतच तब्बल 76 प्रवासी परदेशातून आले, धाकधूक वाढली

28 नोव्हेंबरनंतर फक्त कल्याण डोंबिवलीतच तब्बल 76 प्रवासी परदेशातून आले, धाकधूक वाढली

कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर एकूण 76 प्रवासी परदेशातून आले आहेत. महापालिका प्रशासन आता या सर्व नागरिकांचा शोध घेणार आहे. तसेच सर्व प्रवाशांची आता पुन्हा कोरोना चाचणी (covid test) केली जाणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर एकूण 76 प्रवासी परदेशातून आले आहेत. महापालिका प्रशासन आता या सर्व नागरिकांचा शोध घेणार आहे. तसेच सर्व प्रवाशांची आता पुन्हा कोरोना चाचणी (covid test) केली जाणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर एकूण 76 प्रवासी परदेशातून आले आहेत. महापालिका प्रशासन आता या सर्व नागरिकांचा शोध घेणार आहे. तसेच सर्व प्रवाशांची आता पुन्हा कोरोना चाचणी (covid test) केली जाणार आहे.

ठाणे, 3 डिसेंबर : ठाणे (Thane) जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) शहरात रशिया (Russia) फिरुन आलेल्या एका 7 वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची (Corona) लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरातून एक महत्त्वाची अपडेट आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर तब्बल 76 प्रवासी परदेशातून आले आहेत. या सर्व प्रवाशांची यादी आता महापालिकेच्या हाती लागली आहे. महापालिका आता सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट (Covid test) करणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन कामाला देखील लागलं आहे.

केडीएमसी हद्दीत 'या' देशांमधून प्रवासी आले

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर एकूण 76 प्रवासी परदेशातून आले आहेत. महापालिका प्रशासन आता या सर्व नागरिकांचा शोध घेणार आहे. तसेच सर्व प्रवाशांची आता पुन्हा कोरोना चाचणी केली जाणार आहे. महापालिका हद्दीत 28 नोव्हेंबरनंतर रशिया, दुबई, सिंगापूर, ढाका, शारजा, साऊथ कोरिया, स्वीडन, सौदी अरेबिया, मस्कत अशा विविध देशांमधून नागरीक आले आहेत.

हेही वाचा : राज ठाकरे पुन्हा एकदा सज्ज, महाराष्ट्र दौरा करणार, बैठकींचा सिलसिला सुरु

अंबरनाथमध्ये रशियातून आलेल्या मुलीला कोरोना

अंबरनाथमध्ये रशिया फिरुन आलेल्या एक 7 वर्षीय मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. या मुलीचे स्वॅब आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित सात वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत रशिया फिरायला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांसह 28 नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. अंबरनाथला आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मुलीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट आता समोर आली आहे. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या आई-वडिलांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी वडिलांचा रिपोर्ट हा कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर आईचा कोरोना रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही.

हेही वाचा : मोठा दिलासा ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहप्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह

भारतात कर्नाटकमार्गे ओमायक्रोनचा शिरकाव

दुसरीकडे जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घालणारा ओमायक्रोन विषाणूची भारतात एन्ट्री झाली आहे. कर्नाटक राज्यातील दोघांना या नव्या विषाणूची लागण झाली आहे. दोन्ही रुग्णांचा परस्परांशी काहीच संबंध नाही. पण ते दोघे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

First published:

Tags: Corona