Home /News /maharashtra /

KDMC च्या ड्रायव्हरचा 'प्रताप', व्हॅकसिन व्हॅनमध्ये महिलांना बसवलं, नंतर झालं असं..

KDMC च्या ड्रायव्हरचा 'प्रताप', व्हॅकसिन व्हॅनमध्ये महिलांना बसवलं, नंतर झालं असं..

अत्यावश्यक सेवेतील औषध आणण्याकरीता वापरण्यात येणारी व्हॅनचा गैरवापर...

डोंबिवली, 11 मे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत औषध पुरवण्यासाठी सेवेत असलेल्या व्हॅनचा गैरवापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केडीएमसीच्या वाहन चालकाने चक्क व्हॅनमध्ये काही महिलांना बसवल्याचं समोर आलं आहे. चालक या महिलांना त्यांच्या गावी सोडणार होता. मात्र, लोणावळ्यात पोलिसांना गाडी अडवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने संबंधित चालकावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. हेही वाचा..लॉकडाऊनमुळे नशिबी आली उपासमारी, मोलमजुरी करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या महापालिकेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाबासाहेब भंडारे असं वाहन चालकाचं नाव आहे. बाबासाहेब भंडारे हा कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चालक भंडारे हा चार महिलांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी केडीएमसीचे व्हॅकसिन व्हॅन (एमएच 05-आर- 0927) घेऊन निघाला होता. याबाबत चालक भंडारे त्याने केडीएमसीची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. हेही वाचा..CORONA पोलिसांचा पिछा सोडेना ! 24 तासांत 221 कोरोनाबाधित, 1000 वर पोहोचला आकडा अत्यावश्यक सेवेतील औषध आणण्याकरीता वापरण्यात येणारी व्हॅन दौंड येथे त्यांच्या गावी जाताना लोणावळा चेक पोस्टवर अडवण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चालक भंडारी यांच्याकडे कोणतीही ऑर्डर (परवानगी) नसल्यामुळे ते योग्य ऊत्तर देता आले नाही. पोलिसांना वाहनावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्याचबरोबर याबाबत महापालिकेने चालक बाबासाहेब भंडारे याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एकूण रुग्णांची संख्या 321 वर पोहोचली आहे. यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Coronavirus, KDMC

पुढील बातम्या