लग्न समारंभात होत नाही मग शाळेत कसा होईल कोरोना? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले

लग्न समारंभात होत नाही मग शाळेत कसा होईल कोरोना? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले

आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम, लग्न समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा आम्हाला कोरोना होत नाही मग...

  • Share this:

कल्याण, 14 डिसेंबर: कोरोनाबाधित (Coronavirus)रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईसह (Mumbai) ठाणे जिल्ह्यातील (Thane District) सर्व शाळा (School) 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मात्र, डोंबिवलीमधील काही विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याची मागणी करत केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिलं आहे.

लॉकडाऊन (Lockdown) आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलं आहे. बाजार पूर्वीसारखे सुरु झाले आहेत. आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम, लग्न समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा आम्हाला कोरोना होत नाही मग शाळेत गेल्यानंतर कसा काय कोरोना होईल? असा सवाल या विद्यार्थ्यांनी थेट आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनं आयुक्तही चक्रावून गेले.

हेही वाचा...मु्ख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाणीबिलाची थकबाकी? आता BMCनेच केला खुलासा

डोंबिवली (पूर्व) येथील विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी वेदांत निलेश कुलकर्णी (8 वी, भरत), ओजस प्रभु आणि प्रणव सारंग या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी याबाबत एक निवेदन महापालिका आयुक्तांना दिलं आहे.

विद्यार्थी निवेदनात म्हणतात... 'कोरोना काळात आपण ज्या सेवा पुरविल्या जी काळजी आमची घेतली. त्यासाठी आपले आभार मानतो. सर आम्ही घरात होतो. पण आपले कार्य फेसबूकवरस, मीडीयामध्ये दिसत होतं. खूप कठीण सर, आम्ही पोलीस, प्रशासन, डॉक्टर्स, तहसील व सफाई कर्मचारी यांना सर्वांनां धन्यवाद देतो.

'आमची शाळा' सर, खरं तर ही आमची शाळा राहिलीच नाही. आम्ही उगाच आमची शाळा म्हणतोय. कारण ही शाळा गेल्या 9 महिन्यांपासून बंद आहे. आमचे कसे म्हणावे? मान्य आहे आम्हाला की हे आमच्या आरोग्यासाठीचा शासनाचा योग्य निर्णय असेल.पण एक विद्यार्थी म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षण घेताना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. कान, डोळे, डोकं यांचा खूप प्रॉब्लेम सुरु आहे. आम्ही खूप लहान आहोत. पण स्पर्धा युगात टीकून राहाण्यासाठी आम्हाला घाबरुन घरी बसणे योग्य वाटत नाही. मला NDA मध्ये करीअर करायचे आहे. कोणी डॉक्टर होणार, कोणी IAS, कोणी IPS. आम्ही लहान असलो तरी आमची स्वप्ने मोठी आहेत. आम्हाला या साथील घाबरवून घरात बसवण्यापेक्षा लढायला शिकवा. हेच आमचे मागणे आहे. एक प्रश्न पण आहे.'

हेही वाचा...रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर चक्क भाजप नेत्यानं जोडले हात, केला 'हा' गौप्यस्फोट

'सर्व लॉकडाऊन उघडले, बाजार सुरु झाले आहेत. आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम (मोर्चे, आंदोलने.) समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही. तर शाळेत जाऊन कोरोना कसा होईल? झाला तरी माझ्या आजारासाठी सरकार दोषी नसेल. माझ्या प्रतिकार शक्तीचा दोष असेल.आमचे हे मागणे सरकारपर्यंत पोहोचवा. आमची शाळा सुरु करा. खूप जणांचा याला विरोध असेल पण ज्यांना शिकायचं आहे. त्यांच्या साठी तरी शाळा सुरु करा. चूक भूल लहान समजून माफ करा. आम्ही सर्व नियम पाळू. मस्ती पण नाही करणार. हा बाल हट्ट आहे आमचा.', असं या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading