मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकट्याने सर्वाधिक काळ कॅबिनेट चालवण्याचा विक्रम या मुख्यमंत्र्याच्या नावावर, शिंदे-फडणवीस कितव्या क्रमांकावर

एकट्याने सर्वाधिक काळ कॅबिनेट चालवण्याचा विक्रम या मुख्यमंत्र्याच्या नावावर, शिंदे-फडणवीस कितव्या क्रमांकावर

सरकार स्थापन केल्यानंतर 39 दिवसांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ मंत्रिमंडळाशिवाय सरकार चालवण्याचा विक्रम तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandra Shekhar Rao) यांच्या नावावर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 8 ऑगस्ट : 30 जूनला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर इतके दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. विरोधकांनीही सरकारवर मंत्रिमंडळ विस्तार करत नसल्यामुळे जोरदार टीका केली. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं सांगितलं गेलं, पण फडणवीस आणि शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाची सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आता 39 दिवसांनी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मागचे 39 दिवस शिंदे आणि फडणवीस हे दोघंच राज्य कारभार हाकत होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इतका काळ मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याची ही देशातली पहिलीच वेळ नाही. सर्वाधिक काळ मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याचा विक्रम तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandra Shekhar Rao) यांच्या नावावर आहे. 2018 साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर के.चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 68 दिवसांनी केसीआर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 68 दिवस केसीआर यांनी एकहाती तेलंगणाचं सरकार चालवलं होतं. 13 डिसेंबर 2018 ला केसीआर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर त्यांनी 19 फेब्रुवारीला मंत्रिमंडळाचा विस्तार केला. जुलै 2019 मध्ये कर्नाटकमधलं जेडीएस-काँग्रेस यांचं सरकार पडलं आणि कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर 26 जुलैला बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी तीन आठवडे मंत्रिमंडळाचा विस्तारच केला नव्हता.
First published:

पुढील बातम्या