कश्यपी धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक, 15 ऑगस्टला करणार जलसमाधी आंदोलन

कश्यपी धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक, 15 ऑगस्टला करणार जलसमाधी आंदोलन

1992 साली पूर्ण झालेल्या जमीन अधिग्रहणाची पूर्ण रक्कम अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचं हत्यार हाती घेतलंय.

  • Share this:

13 आॅगस्ट : कश्यपी धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक झालेत. धरणातील मोठा पाणीसाठा हा नाशिकसाठी राखीव आहे, पण या धरणातील उर्वरित पाणी हे गंगापूर धरणात सोडलं जातं. ज्या स्थानिकांच्या जमिनी या धरणात गेल्या त्यांना मात्र पाण्याचं आरक्षण आतापर्यंत मिळालेलं नाही. यामुळे येत्या 15 ऑगस्टला पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.

यात 5 गावातील शेतकऱ्यांचा समावेश असेल. 1992 साली पूर्ण झालेल्या जमीन अधिग्रहणाची पूर्ण रक्कम अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचं हत्यार हाती घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 08:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading