मुंबई, 17 मार्च : करुणा धनंजय मुंडे (Karuna Munde) यांचं नाव खरंतर रेणू शर्मा या प्रकरणावरून बाहेर आलं. रेणू शर्मा नावाच्या एका युवतीने राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (NCP Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हा आरोप करताना धनंजय मुंडे यांची त्या मेहुणी असल्याचे सांगितलं होतं. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रेणू शर्माचे आरोप हे खोटे आहेत. पण तिच्या मोठ्या बहिणीशी म्हणजेच करुणा शर्मा बरोबर आपला विवाह झाला असून मला दोन अपत्य असल्याचंही धनंजय मुंडे यांनी मान्य केलं. त्यानंतर करुणा शर्मा यांनी ही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे करुणा या चर्चेत आल्या होत्या. आज मात्र त्यांनी अचानक महापालिकेत एण्ट्री घेतली आणि सगळेच बुचकळ्यात पडले.
महापालिकेतील भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना करुणा शर्मा यांनी राजकारणातील सक्रियतेबद्दल भाष्य केलं आहे. करुणा शर्मा म्हणाल्या की, आम्ही आता महापालिकेत एक निवेदन दिलं आहे. सध्या मी इंटरनेटवर खूप वाईट व्हिडिओ वायरल होताना पाहते. काही साईट या अश्लीलता पसरवतात. फेसबुकवर सुद्धा काही व्हिडिओ पॉपअप होतात. त्या बंद व्हाव्यात अशी मागणी केली आहे.
करुणा मुंडे राजकारणात येणार? नक्की काय म्हणाल्या...
'मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्ष मी घरात होते. मी आता 2-3 महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. पण करावं लागलं तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. माझ्या मुद्यावर पण मी लवकरच बोलणार आहे. त्याचा निकाल लागला की मी बोलणार आहे. 100 टक्के सगळ्या गोष्टी सांगेन आणि पूर्ण पुराव्यासह सांगेन. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,' अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
'पूजा चव्हाण असेल किंवा आज नवी मुंबईतील एका मुलीला मारून टाकल्याचा मुदा आहे. काही बाबी मीडिया समोर येतात, तर काही येत नाही. तर अशा महिलांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी स्वतः पण आत्महत्या करणार होते. पण मग मी विचार केला की असंच मरण्यापेक्षा लोकांसाठी काही तरी करून मरू. मी लोकांना पण न्याय मिळवून देईल आणि स्वतःसाठी पण न्याय मिळवण्यासाठी मी लढणर आहे,' असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Dhananjay munde