Home /News /maharashtra /

'कोरोनाचं संकट लवकर दूर कर', उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विठुरायाला घातलं साकडं

'कोरोनाचं संकट लवकर दूर कर', उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विठुरायाला घातलं साकडं

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मानाचे वारकरी कवडुजी भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.

    पंढरपूर, 26 नोव्हेंबर : यंदाच्या कार्तिकी एकादशीवर देखील कोरोनाचं सावट असल्याचं पाहायला मिळालं. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियम पाळून कार्तिकी एकादशी निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मानाचे वारकरी कवडुजी भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या पूजेसाठी खास सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे उपस्थित होते. या पूजेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशासह राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर असं साकडं घातलं आहे. तर कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध होऊदे असं विठुरायाचरणी प्रार्थना केल्याचं देखील अजित पवार यांनी स्वत: माहिती दिली. कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा आज पहाटे 2.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी त्यांनी 'राज्यातील जनता सुखी आणि समृध्दी होऊ दे ,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला जनतेची कामं करण्याचं बळ दे', असेही आपण विठ्ठल चरणी साकडं घातल्याचं सांगितलं. आषाढी यात्रेचे थकीत असलेले पाच कोटी रुपये अनुदानाची आर्डर नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे देण्यात आली. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकर्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. तसंच राज्यावर आलेलं हे संकट लवकर दूर व्हावं यासाठी प्रार्थना देखील कऱण्यात आली आहे. दरवर्षी कार्तिकी यात्रेला पंढरपूर भाविकांच्या अलोट गर्दीनं गजबजून जायचं मात्र यंदा कोरोनामुळे अनेक निर्बंध आले आहेत. तर कोरोनाचं सावट असल्यानं भाविकांना दर्शनावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ajit pawar, Vitthal mandir

    पुढील बातम्या