धक्कादायक! कर्नाटकातील स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

धक्कादायक! कर्नाटकातील स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

हुबळी रेल्वे स्थानकात झालेल्या या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे.

  • Share this:

हुबळी (कर्नाटक), 22 ऑक्टोबर : कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर सोमवारी एक भीषण स्फोट झाला. एका अज्ञात वस्तूचा अचानक स्फोट झाल्यामुळे यात 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली होती. या स्फोटामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हुबळी रेल्वे स्थानकात झालेल्या या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक हुबळीला अधिक तपासासाठी रवाना झालं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांआधी कोल्हापूरमधील उजळाईवाडी इथे असाच एक स्फोट झाला होता. यामध्ये एकाने प्राण गमावला होता. हुबळीमध्ये झालेला स्फोट सारखा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याचं समोर आलं आहे. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होतं. पण पार्सल अज्ञात स्थळी पडलं आणि नेमकं ते RPF कडे देताना त्याचा स्फोट झाला. पार्सल वर राजकीय संदेश असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे या स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापूरमधील आमदारांची नावं लिहण्यात आली होती.  प्रकाश अबीटकर यांचे नाव या पार्सलवर लिहण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली आहे. अबीटकर हे राधानगरी भुदरगडचे माजी आमदार आहेत तर ते सध्याचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचं नाव या पार्सलवर कसं आलं. यात त्यांचं काय कनेक्शन आहे याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या - Infosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले!

या सगळ्या घटनेनंतर हुबळी रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, नागरिकांनाही सुरक्षा राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. खरंतर सोमवारी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका 2019साठीचं मतदान पार पडलं. त्यामुळे संपूर्ण राज्यात मतदानासाठी नागरिक बाहेर पडत होते. अशात प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आखण्यात आला होता.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होतं. विधानसभेच्या 288 जागांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली. राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडलं.

इतर बातम्या - EVMचं बटण कुठलंही दाबा, मत कमळालाच; 'या' मतदारसंघात घडला धक्कादायक प्रकार

मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु होती. जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली होती. दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला.

इतर बातम्या - BSP नेत्याच्या तोंडाला काळं फासून काढली गाढवावरून धिंड, VIDEO VIRAL

Published by: Renuka Dhaybar
First published: October 22, 2019, 3:17 PM IST
Tags: karnataka

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading