कर्जतमध्ये राम शिंदेंच्या अडचणी वाढल्या, अजित पवारांनी टाकला डाव

कर्जतमध्ये राम शिंदेंच्या अडचणी वाढल्या, अजित पवारांनी टाकला डाव

राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी आव्हान दिलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 23 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीत जाहीर झाल्यानंतर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. या निवडणुकीत काही हायप्रोफाईल लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचाही समावेश आहे. कारण या  मतदारसंघात अहमदनगरचे पालकमंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी आव्हान दिलं आहे. मात्र अशातच राम शिंदे यांना धक्का बसला आहे.

राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबतच उपसभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने राम शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

रोहित पवारांचं आव्हान

पवार कुटुंबातील तरुण पिढी आता राजकारणात सक्रिय होत आहे. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा-'तिकीट द्या नाहीतर पक्ष सोडतो', राष्ट्रवादीच्या नेत्याचे थेट शरद पवारांना आव्हान!

विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केली होती. रोहित यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मुलाखतही दिली. त्यानंतर आता ते कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील हे निश्चित झालं.

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केली आहे. याआधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र अखेर त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कर्जत मतदारसंघावर शिक्कामोर्तब केलं.

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या