मुंबई, 14 सप्टेंबर : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिली. ऑनलाईन अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख होती. पण आता त्याला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय.
येत्या सात दिवसात उर्वरित शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलंय. दरम्यान, अर्ज भरण्याला मुदतवाढ मिळाली असली आम्ही कसल्याही परिस्थितीत दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करू, असा दावा सहकारमंत्र्यांनी केलाय.
काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी आतापर्यंत कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरू शकले नव्हते, हे सर्वजण कर्जमाफीपासून वंचित राहू नयेत, यासाठीच ही मुदतवाढ देण्यात आल्याचं शासनाने स्पष्ट केलंय. दरम्यान, आतापर्यंत 46 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेत. सरकारला साधारण 89 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरणं अपेक्षित आहे.