• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कर्जमाफीच्या अंमलबजावणीला आणखी एक महिन्याचा विलंब लागणार !

कर्जमाफीच्या अंमलबजावणीला आणखी एक महिन्याचा विलंब लागणार !

सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणं बंधनकारक केल्याने या प्रक्रियेला किमान एक महिन्याचा अवधी जाणार आहे. आज कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य स्तरीय बँकांची मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली त्यात ही बाब समोर आलीय

  • Share this:
मुंबई, 24 जुलै: राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला मात्र, किमान महिन्याचा अवधी लागणार आहे. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणं बंधनकारक केल्याने या प्रक्रियेला किमान एक महिन्याचा अवधी जाणार आहे. आज कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य स्तरीय बँकांची मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली त्यात ही बाब समोर आलीय. कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून सरकार बँकामार्फत अर्ज भरून घेणार त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे या अर्जांची पडताडणी होईल त्यानंतरच सर्व बाबी तपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, विरोधकांनी मात्र, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला विरोध केलाय. सरकारने विनाअट आणि विनाअर्ज कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधकांनी केलीय.
First published: