मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कराटे चॅम्पियन पत्नीने पतीचा केला खून, मृतदेह जाळला अन् मुंडके दिले फेकून, मुलानेही केली मदत

कराटे चॅम्पियन पत्नीने पतीचा केला खून, मृतदेह जाळला अन् मुंडके दिले फेकून, मुलानेही केली मदत

या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे.

या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे.

या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे.

  • Published by:  sachin Salve
नरेंद्र मते, प्रतिनिधी हिंगणघाट, 10 ऑगस्ट : वर्धा (wardha) जिल्ह्यातील पुलगावच्या हिंगणघाटमध्ये काही दिवसांपूर्वी एका मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत गुढ उकलले आहे. पत्नीनेच (wife) आपल्या पतीची हत्या (husband murder) केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, मुलाच्या मदतीनेच पत्नीने पतीची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैल येथील अनिल मधुकर बेंदले (46) याची शुक्रवारी 5 रोजी रात्री पत्नीने हत्या केली होती. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून मुलाच्या मदतीने ऑटोमध्ये पुलगाववरून 10 किमीर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावात नेऊन मृतदेहाचे तुकडे जाळले होते तर शीर हे पुलगाव येथे फेकले. या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा मृतकाच्या पत्नीला अटक केली. एक मुंडके हे दोन दिवसांपूर्वी पुलगावातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका झुडपात मिळाले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत खुनाचा उलगडा केला. खुनामागे पत्नी असल्याचे पुढे आले. हिंगणघाट फैल येथील अनिल दारू पिण्याच्या सवयीचा होता. तो सुरुवातीला गृहरक्षक दलामध्ये काम करीत होता. तेथून त्याला काढल्यानंतर सध्या मजुरीचे काम करायचा. त्यामुळे पत्नीसोबत रोज घरी वाद होत होते. रोजच्या वादाला कंटाळून पत्नी मनीषाने पती अनिलची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून 2 बॅगेत भरले आणि मुलाला दोनशे रुपयांमध्ये ऑटो भाड्याने करायला सांगितला. (राकेश-शमिताच्या ब्रेकअपसाठी लोकांनी रिद्धीला धरलं जबाबदार;अभिनेत्रीने दिलं उत्तर) ऑटोने मृतदेह 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बोधड या मूळ गावामध्ये आणून घराचा मोठ्या परिसर असल्यामुळे तिथे जाळला. सासर्‍याने बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता 'जुने कपडे जाळायला आणले' असे मनीषाने सांगितलं. पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून मृतकाची पत्नी मनीषा आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मृतकाच्या शरिराचे अवशेष ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे पत्नी पतीची हत्या कशी करू शकते अशी चर्चा रंगत आहे. पत्नी कराटे चॅम्पियन आहे. (प्रितीने 3 वर्षांच्या लेकीसह घेतला गळफास, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार) उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशाल राठोड, संजय पटले, पंकज टाकोने, महादेव सानप, शरद सानप पुढील तपास करत आहे.
First published:

पुढील बातम्या