Home /News /maharashtra /

"तुरुंगात असताना आजारी होतो, तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला" : छगन भुजबळ

"तुरुंगात असताना आजारी होतो, तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला" : छगन भुजबळ

"तुरुंगात असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला" : छगन भुजबळ

"तुरुंगात असताना कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला" : छगन भुजबळ

Kapil Patil Saved my life said Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगात असतानाची एक आठवण जाहीरपणे सांगितली आहे.

    जळगाव, 25 सप्टेंबर : जळगावात आज ओबीसी आरक्षण हक्क परिषद (OBC Reservation) पार पडली. या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. यावेळी भाषण करताना भुजबळांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. आपण ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यामुळे माझा जीव वाचला असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. पाहूयात छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे. ओबीसी आरक्षण परिषदेत भाषण करताना छगन भुजबळांनी म्हटलं, "मी इथे आलो. कपिल पाटलांचा फोन आला. या माणसाने माझा जीव वाचवला. या कपिल पाटलाने... तुम्हाला माहिती आहे का. जेलमध्ये जेव्हा टाकलं तेव्हा दोन-तीन वेळा फार सीरिअस झालो. ज्यावेळी कळलं की भुजबळ फार सीरिअस आहेत त्यावेळी हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले आणि सांगितलं काय तुम्ही वागणूक देतात? मारुन टाकणार का तुम्ही? ज्या माणसाने माझा जीव वाचवला त्याचा शब्द मोडू शकत नाही आणि मी इथे आलो." छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळ्यातून काही दिवसांपूर्वीच न्यायलयाने दोषमुक्त केलं. याच घोटाळ्याच्या आरोपाखाली त्यांना कारागृहात दोन वर्षे घालवावी लागली होती. त्या दरम्यान घडलेला प्रसंग छगन भुजबळ यांनी जळगावातील ओबीसी आरक्षण हक्क परिषदेत सांगितला. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांचंही कौतुक केलं. जळगावात NCP चा शिवसेनेला झटका, माजी आमदार कैलास पाटलांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ भाजपवर टीका जळगावात आज ओबीसी आरक्षण हक्क परिषद पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणावर गदा आली असल्याचा आरोप केला. आरक्षणासाठी आम्ही एकत्र असल्याचा संदेश देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिला. गिरीश महाजनांची मविआ सरकावर टीका मात्र भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला असून ओबीसी मराठा आरक्षणाचे तीन तेरा या सरकारने वाजवले आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत हे सरकार उघडे पडले असून या सरकारला आरक्षण नकोय. ओबीसींवर जी परिस्थिती ओढावली याला जबाबदार छगन भुजबळ व त्यांचे सरकार असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तुम्ही राज्यकर्ते असतांना तुम्ही कशाला फिरत आहे तुम्ही तुमची भूमिका तिकडे कोर्टात मांडा केंद्र सरकारकडे मांडा ते सोडून व लोकांची दिशाभूल करण्याचे काम छगन भुजबळ करत असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chagan bhujbal, Jalgaon, NCP

    पुढील बातम्या