कानडी थयथयाट महाराष्ट्रामध्ये? संघटनेचं राज्यात पदार्पण

कानडी थयथयाट महाराष्ट्रामध्ये? संघटनेचं राज्यात पदार्पण

एका कानडी संघटनेचं महाराष्ट्रात पदार्पण झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, बेळगाव, 29 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठी-कानडी वाद पेटला आहे. कर्नाटकमधील एका संघटनेनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे बेळगावसह कोल्हापूरमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यातच आता एका कानडी संघटनेचं महाराष्ट्रात पदार्पण झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक विश्वनिर्माण सेनेची शाखा महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील एका गावामध्ये या संघटनेची शाखा स्थापन करण्यात आल्याचे फोटो 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागले आहेत. तसंच काही लोकांनी या संघटनेत प्रवेश केल्याचंही या फोटोंमध्ये दिसत आहे. त्यामुळे सीमाप्रश्नावरून वाद उफाळून आला असताना कन्नड संघटना महाराष्ट्रमधील कानडी लोकांच्यात विष पेरत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात मराठी-कानडी वाद आता चांगलाच चिघळला आहे. कन्नड संघटनेच्या भीमाशंकर पाटील यांची गोळ्या घालण्याची भाषा, माजी मंत्री बसवराज यांचे वादग्रस्त वक्तव्य, नंतर बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याचे प्रकरणाचे रविवारी पडसाद उमटले आहे. शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. अप्सरा थिएटर येथील चालू असलेली 'अवणे श्रीमनारायन' ही कन्नड फिल्म युवासैनिकांनी थेटरमध्ये घुसून बंद पडली.

दुसरीकडे, कोल्हापूर बसस्थानकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. विशेष म्हणजे कर्नाटकातील नागरिकांच्या हस्ते हा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरच्या बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनावेळी कर्नाटक सरकार आणि कानडी संघटनांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासूनच कोल्हापूर-बेळगाव म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही बससेवा बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे.

कोल्हापूर कानडी संघटनांना शिवसैनिकांचे प्रत्युत्तर कोल्हापूरमधील कानडी फलकांना काळे फासले. अनेक दुकानांवर कानडी भाषेत फलक महामार्गावर अनेक धाब्यावरही कानडी भाषेतील फलक शिवसैनिकांनी हटवले. दरम्यान, मराठी फलकांवर बेळगावमध्ये शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली होती.

First published: December 29, 2019, 5:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading