तीन तास रास्ता रोको करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक Kannad | Harshvardhan Jadhav | Arrested | Aurangabad

तीन तास रास्ता रोको करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक  Kannad | Harshvardhan Jadhav | Arrested | Aurangabad

तीन तास रस्ता अडवणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 25 जून: तीन तास रस्ता अडवणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. कन्नडचे आमदार जाधव यांनी हतनूर येथे तीन तास रस्ता आडवला होता. पीक विमा कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत. तसेच हातनूर रस्त्याच्या कामाबद्दल आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन सुरु केले होते.

शेतकऱ्यांनी पीक विमा लवकरात लवकर मिळावा तसेच हतनूर रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी आमदार जाधव यांनी मंगळवार सकाळपासून रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. जाधव यांनी सकाळी 10 वाजल्यापासून रास्ता रोको सुरु केले होते. पोलिसांनी अनेक वेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण आमदार जाधव यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर बराच वेळ रस्ता अडवल्यामुळे कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जाधव यांना पोलीस ठाण्याकडे घेऊन जात आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. जाधव यांच्या आंदोलनामुळे हतनूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

SPECIAL REPORT: आगीचा खेळ, अस्वलाचे हाल

First published: June 25, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading