मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिल्लोडमध्ये टम्पोने दुचाकीला 3 किमी नेलं फरफटत.. अपघातात गाडी चक्काचूर तर तरुण..

सिल्लोडमध्ये टम्पोने दुचाकीला 3 किमी नेलं फरफटत.. अपघातात गाडी चक्काचूर तर तरुण..

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार जवळ आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार जवळ आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार जवळ आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू.

    अविनाश कानडजे, औरंगाबाद सिल्लोड, 8 ऑगस्ट : दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याला अनेक कारणं आहेत. मात्र, भारतात दररोद मृत्यू होणाऱ्यांमध्ये अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. यावरुन याचं गांभीर्य लक्षात येईल. यासाठी जनजागृती अभियानही राबवले जात आहेत. मात्र, अपघातांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रोडवरील मोठ्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रोडवर बोरगाव बाजार येथील पूर्णा नदीवरील पुलाजवळ कन्नड कडून भरधाव येणार्‍या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समाधान अशोक देवरे वय 30 राहणार जामडी तालुका कन्नड या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मिरचीने भरलेल्या लोडींग आयशर टेम्पो हा कन्नडच्या दिशेकडून भरधाव वेगाने सिल्लोडकडे जात असताना समोरून येत असलेल्या समाधान अशोक देवरे यांच्या दुचाकी गाडीला जोराची धडक दिली. विशेष म्हणजे आयशर टेम्पो चालकाने तरुणाची दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी टेम्पोला अडकून सुमारे 3 किलोमीटर पर्यंत घसरत नेली होती, या दुचाकीमुळे आयशर टेम्पोची डिझेल टाकी फुटली असल्यामुळे आयशर टेम्पो चालकाने गाडी रोडवरच उभी करून फरार झाला. अपघात एवढा भिषण होता की दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Bike accident

    पुढील बातम्या