लढत विधानसभेची : कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार?

शिवस्वराज्य पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातल्या लढतीमुळे इथली निवडणूक चुरशीची झाली. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव आमदारकीला उभे राहिले तर इथे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 05:47 PM IST

लढत विधानसभेची :  कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार?

औरंगाबाद, 18 सप्टेंबर : शिवस्वराज्य पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातल्या लढतीमुळे इथली निवडणूक चुरशीची झाली. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव आमदारकीला उभे राहिले तर इथे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

हर्षवर्धन जाधव हे गेल्या 10 वर्षांपासून कन्नड मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. ते आधी मनसेमध्ये होते, नंतर शिवसेनेतर्फे आमदार झाले. मग त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला आणि शिवस्वराज्य पक्ष हा स्वत:चा वेगळा पक्ष काढला.

कनन्ड मतदारसंघात मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे. बंजारा माळी, मुस्लीम आणि इतर जातीधर्माच्या लोकांचंही या मतदारसंघात प्राबल्य आहे.

हर्षवर्धन जाधव हे यावेळी स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. पण यावेळी मात्र इथे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांना 46 हजार 106 मतं मिळाली. 2014 मध्ये त्यांना 62 हजार 542 मतं मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंग राजपूत यांना 2009 साली 41 हजार 999 मतं मिळाली. 2014 साली त्यांना 60 हजार 981 मतं पडली.

Loading...

लढत विधानसभेची : मध्य सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ

उदयसिंह राजपूत यांना 2014 मध्ये निसटचा पराभव स्वीकारावा लागला. आता हेच उदयसिंह राजपूत शिवसेनेत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेने तिकीट दिलं तर हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना अशी लढत इथे होईल. पण शिवसेनेतून केतन काजे, मारोती राठोड हे नेतेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हेसुद्धा या मतदारसंघात प्रचारासाठी उतरतील.

आघाडीच्या जागावाटपात कनन्ड मतदारसंघ कुणाकडे जातो हे पाहावं लागेल पण काँग्रेसमधून नामदेव पवार, नितीन पाटील, संतोष कोल्हे असे नेते इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीही या मतदारसंघात उमेदवार उतरवेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या चढाओढीत हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा इथून आमदार होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

हर्षवर्धन जाधव - 62 हजार 542 मतं

उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस - 60 हजार 981 मतं

=====================================================================================

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...