मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केल्यानं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनाविरुद्ध भाजप, भाजपविरुद्ध काँग्रेस, मनसेविरुद्ध कंगना, कंगनाविरुद्ध संजय राऊत असं सध्या ट्वीट युद्ध सुरू झालं आहे. यात आता महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.
कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन केलं आहे. कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखीव यावेळी महिला शिवसैनिकांनी दिला.
हेही वाचा... सरकारकडून स्वस्त सोनेखरेदीची यावर्षातील अखेरची संधी, वाचा काय आहेत फायदे
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आलं. महिला शिवसैनिकांनी या वेळेस कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. कंगना रणौत हिनं केलेलं वक्तव्य हे निषेधार्य आहे. ती जर असंच बालिश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू. ती 9 सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये शिवसेना महिला स्वागत करतील, असा इशारा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.
कंगना रणौतच्या पोस्टरला काळं फासलं, जोडेही मारले... पाहा VIDEO@KanganaTeam @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/fuf93x6UzY
— News18Lokmat (@News18lokmat) September 4, 2020
शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या व मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात आंदोलन करून निषेध केला व फोटोला जोडे मारले.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच...
कंगना हिच्यावर चहुबाजुंनी टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाचं नाव न घेता तिला फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संजय राऊत म्हणाले, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise.असं ट्वीट करत त्यांनी पुढची दिशा काय राहील याचे संकेतच दिले आहेत. या आधी कंगनाने ट्वीट करत टीका केली होती.
कंगनाचं ओपन चॅलेंज...
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.
'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा...कंगनानं दिलेल्या 'ओपन चॅलेंज'वर काय म्हणाला मनसे नेता, केल्या 2 मागण्या
कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Sanjay raut, Shiv sena