Home /News /maharashtra /

तरुणाने भर-रस्त्यात प्रेयसीला केली मारहाण, पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

तरुणाने भर-रस्त्यात प्रेयसीला केली मारहाण, पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रेयसीला मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण, 17 ऑक्टोबर : 'तुझासाठी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देत आहेस? असं विचारत एका विवाहित तरुणाने प्रेयसीला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. प्रेयसीला मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजित कनोजिया असं या प्रियकराचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सर्योदय मॉलमध्ये कामाला आहे. ही तरुणी आपले काम आटोपून मॉलच्या खाली आली असता एका तरुणाने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तिला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी या तरुणाला पकडले. मात्र तो पळून गेला. तरुणाचे नाव अजित कनोजिया असून काही वर्षापासून त्याचे या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु होते. दहा दिवसापूर्वी आपल्या या प्रियेसीसाठी अजितने आपल्या पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर या तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला. मात्र तरीही अजित प्रेयसीचा लग्नासाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न करत होता. यासाठीच अजित त्याची प्रेयसी काम करत असलेल्या मॉलखाली आला आणि त्याने तिला सांगितले की, तुझासाठी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देत आहे? अजितच्या प्रश्नावर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादातून अजितने प्रेयसीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाचा तपास दीपक सवरेदय यांना दिला. त्यांनी अवघ्या 2 तासाच आरोपीला अटक केली आहे. 
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Kalyan

पुढील बातम्या