VIDEO : पोलिसांची टोइंग व्हॅन घुसली दुकानात; भर गर्दीच्या वेळचा थरार CCTV मध्ये कैद

VIDEO : पोलिसांची टोइंग व्हॅन घुसली दुकानात; भर गर्दीच्या वेळचा थरार CCTV मध्ये कैद

रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचा चक्काचूर करत ही व्हॅन दुकानाच्या कडेला धडकली. कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ही घटना घडली.

  • Share this:

कल्याण, 30 जानेवारी : ऐन गर्दीच्या वेळी भरधाव आलेली वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसली आणि परिसरात खळबळ उडाली. कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण गाड्यांचं आणि दुकानाचं नुकसान झालं आहे. रहदारीला अडथळा आणणाऱ्या गाड्या उचलून नेणाऱ्या टोइंग व्हॅनमुळेच काही काळ या परिसरात रहदारी अडली होती. कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या जवळच हा प्रकार घडला. या घटनेचा परिसरातल्या नागरिकांनी धसका घेतला होता. त्यामुळे नंतर किती तरी वेळ याचीच चर्चा होती.

कल्याण स्टेशन परिसरातल्या राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानात हा टोइंग टेम्पो घुसला. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या गाडीने रस्त्याकडेला असलेल्या पार्क केलेल्या दुचाकीही उडवल्या. या गाड्यांचा चक्काचूर करत ही व्हॅन दुकानाच्या कडेला धडकली. नशीब बलवत्तर म्हणून गाडीचा वेग नियंत्रणात आला आणि जीवितहानी झालेली नाही. या घटनेत ज्वेलर्सच्या दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे. किमान 15 ते 20 बाइक्स आणि इतर दुचाकींचं नुकसान झालं आहे.

दुकानदार ही वेगाने येत असलेली व्हॅन बघत असतानाच अचानक त्यांच्या दिशेने गाडी आली, असं व्हिडीओत दिसत आहे. टोइंग व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटला आणि गाडी बाजूच्या वाहनांवर धडकली.

या घटनेत कुठल्याही दुचाकीस्वाराला लागलं नाही, पण गाड्यांचं नुकसान झालं आहे. घटनेनंतर नागरिकांनी व्हॅनचालकाला तिथून गाडी काढू दिली नाही आणि नुकसान भरपाईची मागणी केली. नेमका कशामुळे चालकाचा ताबा सुटला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kalyan
First Published: Jan 30, 2020 04:29 PM IST

ताज्या बातम्या