Home /News /maharashtra /

मृत्यूनंतर वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उचललं अनोखं पाऊल, सगळीकडे होत आहे कौतुक

मृत्यूनंतर वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उचललं अनोखं पाऊल, सगळीकडे होत आहे कौतुक

सामाजिक बांधिलकी जपून श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

कल्याण, 25 जून : दुर्धर आजाराने निधन झालेल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्याणातील एका कुटुंबीयांनी एक आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या 12 व्याला रक्तदान शिबीर आयोजित करून त्यांना अत्यंत अनोख्या आणि सामाजिक बांधिलकी जपून श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणारे उदय सकपाळ यांचे 17 जून रोजी अप्लास्टिक ऍनिमिया या दुर्धर आजाराने निधन झाले. या आजारामध्ये त्यांना सतत रक्ताची गरज भासायची. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ज्याचा मोठा फटका उदय सकपाळ यांच्यासारख्या रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना सहन करावा लागला. एकीकडे वडिलांच्या शरिरातून कमी होत जाणाऱ्या प्लेटलेट्स आणि दुसरीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे असलेली रक्ताची कमतरता अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले होते. हा सर्व त्रास पाहता “येत्या 28 जूनला आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजनही केले होते. परंतु त्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराबाबत काय निर्णय घ्यायचा याच्या विचारात आम्ही होतो. आणि आमच्या वडिलांसाठी रक्त गोळा करताना आम्हाला जो त्रास झाला, ज्या अडचणी आल्या त्या इतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना येऊ नये या विचारातून हे रक्तदान शिबिर घेण्याचा आणि त्याद्वारे बाबांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय आम्ही घेतला,' अशी माहिती सकपाळ कुटुंबीयांनी दिली. तसेच 28 जूनला बाबांना जाऊन 12 दिवस होत असून आमच्यावर जी वेळ आली ती इतर कोणावरही येऊ नये यासाठी याचदिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे सांगत इच्छुक रक्तदात्यांनी त्यासाठी पुढे येण्याची विनंतीही सकपाळ कुटुंबीयांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

First published:

Tags: Kalyan

पुढील बातम्या