खळबळजनक! बहिणीला छेडल्याचा बनाव, लुटले १६ लाख रुपये

खळबळजनक! बहिणीला छेडल्याचा बनाव, लुटले १६ लाख रुपये

बहिणीला छेडल्याचे म्हणत मारहाण करून 16 लाख रुपये लुटले होते.

  • Share this:

ठाणे, 29 मार्च : कंपनीची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी जाताना 16 लाख रुपये लुटल्याची घटना कल्याणमध्ये घडली होती. शशिकांत चव्हाण हा तरुण कंपनीचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात असताना ही घटना घडली होती. दोन तरुणांनी त्याला बहिणीची छेड काढल्याचे म्हणत अडवले आणि मारहाण करून 16 लाख रुपये घेऊन पळाले. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे.

कल्याणमध्ये बँकेत पैसे जमा करण्यास जाताना दोन तरुणांनी अडवले. त्यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन बेदम मारहाण केली. त्याच्याकडचे 16 लाख रुपये लुटले. यानंतर महात्मा फुले पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कल्याण गुन्हे अन्वेषण पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला. या प्रकरणी लखन रोकडे, प्रतिक अहिरे, योगेश राजवळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेचा सूत्रधार योगेश राजवळ असल्याचेही पोलिसांनी सांगितलं.

योगेश राजवळ हा आधी त्याच कंपनीत कामाला होती. त्याच्या जवळून पोलिसांनी 14 लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि तीन दुचाकी जप्त केल्या.

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?

First published: March 29, 2019, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading