कल्याण, 5 डिसेंबर : जेवताना 6 वर्षीय मुलाने लघूशंका केली म्हणून बापाने गरम चमच्याचे चटके देत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आाहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात राहणाऱ्या एका सहा वर्षीय मुलासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात राहणाऱ्या सचिन कांबळे याच्या सहा वर्षीय मुलाला पायाच्या मांडीवर आणि पार्श्वभागावर मोठ्या जखमा झाल्याचे मुलाच्या नातेवाईकांनी पाहिल्या. या संदर्भात त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता मुलाने सांगितले की, त्याला वडिलांनी मारले आहे.
मुलासोबत असा प्रकार का केला याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या महिलेला सुद्धा मुलाचा बाप सचिन कांबळे याने दमदाटी केली आणि पिटाळून लावले. ही महिला मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली. मुलासोबत मुलाच्या अंगावरील चटके पाहून पोलीसही हवालदील झाले.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कांबळे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मुलाने जेवताना लघूशंका केली. याचा राग मनात ठेवून त्याने घरातील चमचा गरम केला आणि मुलाला चटके देऊन जखमी केले. तसेच मारहाणही केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिन कांबळे याची तीन लग्ने झालेली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृ्त्यूनंतर दुसऱ्या पत्नीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या पत्नीकडून हा लहान मुलगा आहे. सचिन हा मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.