कल्याण,17 जुलै: कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर असलेल्या गावातल्या मुलांना कंबरेएवढ्या पाण्यातून शाळा गाठावी लागते. कुंदे गावापासून बांगरवाडी गावाला जायच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्यात एक ओढा लागतो. या एकाच रस्त्यावरून गावातले गावकरी आणि विद्यार्थ्यांना जावं लागतं. अगदी लहान मुलांनाही कंबरेएवढ्या पाण्यातून डोक्यावर दप्तर पकडून पाण्यातून वाट काढावी लागतेय. तसंच भिजलेल्या कपड्यात दिवसभर शाळेत बसावं लागतं. त्यामुळे विद्यार्थी आजारी पडताहेत. मागच्या अनेक वर्षांपासून इथल्या गावकऱ्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. पण इथं एक चांगला रस्ता किंवा पूल बांधण्याची तसदी प्रशान घेत नाही.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.