बिबट्या आला रे आला, कल्याणच्या मलंग गड परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्या आला रे आला, कल्याणच्या मलंग गड परिसरात दहशतीचे वातावरण

महिनाभरापूर्वी देखील बिबट्याने मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटने गावात दर्शन दिले होते

  • Share this:

कल्याण, 16 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाउनचा फटका आता जनावरांनाही बसला आहे. पाणी आणि अन्नाच्या शोधात जनावर शहरात शिरकाव करत असल्याचं दिसून आलं आहे.

नेवाळी येथील मलंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या फ्युनिक्युलर शासनाच्या प्रकल्पाच्या खाली असलेल्या वस्तीच्या ठिकाणी बिबट्याच्या वावर असल्याचे दिसून आले आहे. एका शेताच्या विहिरीत पाणी  पिण्यासाठी आला असताना त्याचे ठसे दिसले आहेत.

हेही वाचा -संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण..

वाढत तापमान आणि जंगलातील पाण्याची कमतरता त्यामुळे पाणी आणि अन्नाच्या शोधात बिबट्याने आपली स्वारी मलंगगडाच्या दिशेने सुरू केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती देखील सुरू केली आहे.

महिनाभरापूर्वी देखील बिबट्याने मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटने गावात दर्शन दिले होते. त्या नंतर पुन्हा बिबट्या मलंगडाच्या पायथ्याशी आला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - 436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

वन विभागाकडून दोन कर्मचारी मलंगगडाच्या पायथ्याशी तैनात करण्यात आले आहेत. बिबट्याने एक गाय आणि कुत्र्यांना लक्ष केले असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: May 16, 2020, 4:25 PM IST
Tags: kalyan

ताज्या बातम्या