कल्याण, 28 मार्च : शाळेच्या आवारातच ४ थीच्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे. सुरज भोईर असं हत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या प्रकरणी मुलाच्या काकाला ताब्यात घेण्यात आलंय.
मुरबाड तालुक्यातील नांदेणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सूरज हा आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास लघुशंके साठी वर्गा बाहेर पडला, मात्र तो परत आलाच नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सुरजचा शोध घेण्यास सुरवात केली, तेव्हा सूरज हा शाळेच्या आवारात असणाऱ्या एका रूममध्ये मृत अवस्थेत आढळून आला. सूरजच्या गळ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत, मुरबाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र शाळेच्या आवारात ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सुरजची हत्या कोणी केली का केली याचा शोध पोलीस घेत आहेत, दरम्यान या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी सुरजच्या काकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.