पंतप्रधानांच्या कल्याणच्या कार्यक्रमात शिवसेनेला डावललं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही?

पंतप्रधानांच्या कल्याणच्या कार्यक्रमात शिवसेनेला डावललं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही?

मतभेद दूर करण्यासाठी उद्धव ठकरेंनाही मानाने बोलावलं जाईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्याची शक्यता आता मावळल्यात जमा आहे.

  • Share this:

प्रदिप भणगे, कल्याण, 17 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 18 डिसेंबरला कल्याणमध्ये मेट्रोचं भूमीपूज होणार आहे या कार्यक्रमावरुन भाजप शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सरू सुरू झालीय. कार्यक्रमाला आता काही तास राहिले असताना अजुनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणं अपेक्षीत होतं. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी  कल्याणमध्ये बॅनर युद्ध रंगलंय. मेट्रोचं श्रेय घेण्यावरुन भाजप-शिवसेनेत चढाओढ सुरू झालीय. भाजप आणि शिवसेनेने सर्व शहरात बॅनर्स लावले असून आपल्यामुळेच हा प्रकल्प होत असल्याचा दावा केलाय.

मेट्रो भूमिपूजनाच्या निमित्तानं  भाजपला  श्रेय घेण्याची आयतीचं मिळाली.  भाजपनं कल्याण - डोंबिवलीच्या नाक्या नाक्यावर बॅनरबाजी केलीय. तर शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलय. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप-सेना युतीची सत्ता आहे. महापालिकेत

दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मेट्रोच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकरांना त्याचा अनुभव आला. शिवसेना आणि उद्धव ठकरे हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची एक संधीही सोडत नाहीत.

त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना बोलावलं जाईल क याबद्दल चर्चा सुरू होती. त्यातच मुख्यमंत्र कायम हे युती होणारच असं सांगत असल्याने मतभेद दूर करण्यासाठी उद्धव ठकरेंनाही मानाने बोलावलं जाईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्याची शक्यता आता मावळली असून वेळेवर निमंत्रित केलं तर उद्धव ठकरेही निमंत्रण स्वीकारणार नाहीत असंही बोललं जात आहे.

 

अंधेरीतल्या रुग्णालयातील भीषण आगीचा EXCLUSIVE VIDEO

First published: December 17, 2018, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading