केडीएमसीचे महापौर लागले कामाला,मध्यरात्री 'मिशन खड्डे बुजवा' सुरू !

केडीएमसीचे महापौर लागले कामाला,मध्यरात्री 'मिशन खड्डे बुजवा' सुरू !

कल्याण डोंबिवलीत खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मध्यरात्री २ वाजता हजर राहुन खड्डे बुजवण्याचा कामाचा आढावा घेतलाय

  • Share this:

कल्याण,27 ऑक्टोबर:  कल्याण डोंबिवलीतील रस्ते 'खड्यात' गेल्यानंतर अखेर प्रशासनाला आता जाग आली आहे. खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मध्यरात्री २ वाजता हजर राहुन खड्डे बुजवण्याचा कामाचा आढावा घेतलाय. ज्या रस्त्यावर डागडुगजीचं काम सुरू होतं त्याच रस्त्यावर खड्ड्यात पडून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतरही खड्डे जसेच्या तसेच होते.

सेनेचे महापौर जातीने लक्ष घालून मध्यरात्री खड्डे बुजवण्याच्या मोहिमेवर निघाले. परंतु हे काम राज ठाकरे येत आहे म्हणून नाही तर अशी काम आम्ही नेहमी करतो असे महापौरांचे म्हणणे आहे.परंतु माहिनोंमहिने रस्त्यांवरील खड्डे जेव्हा कायम राहतात तेंव्हा सामान्यांसाठी हे राजकारणी एवढ्या तातडीने काम करतांना का दिसत नाहीत?? असा प्रश्न उपस्थित  झाला आहे.

महापौरांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येलाही रात्री स्वत: कल्याण शहरातील काही भागांमध्ये फिरून अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करून घेतले होते. देवळेकर यांनी १५ दिवसांत संपूर्ण कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी देवळेकर यांनी अचानक मंगळवारी मध्यरात्री दौरा केला होता.त्यामुळे नक्की ही पाहणी केली याबद्दल मात्र संभ्रम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 09:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading