कल्याणमध्ये 'मौत का कुआ'चा 'खराखुरा' थरार ! अपघातादरम्यान 'स्टंट गर्ल' गंभीर जखमी

कल्याणमधील दुर्गाडी इथल्या जत्रेत 'मौत का कुआ' या खेळात शिवानी गजभीये गंभीर जखमी झाली आहे. काल रात्री 9.45 वाजता हा मौत का कुआच्या शो दरम्यान हा अपघात घडलाय. 'मौत का कुआ'मध्ये कारमधून पाय बाहेर काढून स्टंट करत असताना तिचा पाय वरच्या रेलिंगमध्ये अडकला आणि ती उलटी लटकली, तेवढ्यात मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारला ती जोरात धडकली आणि मौत का कुवामध्ये कोसळली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 11:47 PM IST

कल्याणमध्ये 'मौत का कुआ'चा 'खराखुरा' थरार ! अपघातादरम्यान 'स्टंट गर्ल' गंभीर जखमी

प्रदीप भणगे, प्रतिनिधी, कल्याण

कल्याण, 26 सप्टेंबर : कल्याणमधील दुर्गाडी इथल्या जत्रेत 'मौत का कुआ' या खेळात शिवानी गजभीये गंभीर जखमी झाली आहे. काल रात्री 9.45 वाजता हा मौत का कुआच्या शो दरम्यान हा अपघात घडलाय. 'मौत का कुआ'मध्ये कारमधून पाय बाहेर काढून स्टंट करत असताना तिचा पाय वरच्या रेलिंगमध्ये अडकला आणि ती उलटी लटकली, तेवढ्यात मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारला ती जोरात धडकली आणि मौत का कुवामध्ये कोसळली.

या अपघातानंतर तिला तात्काळ कोनगावच्या वेद हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. सध्या ती पूर्ण शुद्धीत असल्याचं डॉक्टरांनी सागितलंय या दुर्घटनेत तिचा मृत्यूही ओढवला जाऊ शकत होता. अजूनही ती या धक्क्यातून पू्र्णपणे सावरलेली नाही. मौत का कुआमधील या अपघाताबाबत अद्यापतरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र अपघाताची नोंद कल्याणच्या पोलीस ठाण्याच करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी ही माहिती दिली आहे. पण या घटनेनंतर या जीवघेण्या खेळावर बंदी का घालण्यात येऊ नये असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

हा पाहा 'मौत का कुआ'चा खराखुरा थरार! खालील व्हिडिओ तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकतो 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 11:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...