Home /News /maharashtra /

Kalyan News: वडिलांनी 6 वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी, कल्याणमधील घटनेचा LIVE VIDEO आला समोर

Kalyan News: वडिलांनी 6 वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी, कल्याणमधील घटनेचा LIVE VIDEO आला समोर

वडिलांनी चिमुकल्याला घेऊन धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी, कल्याणमधील घटनेचा LIVE VIDEO समोर (Photo: Screengrab from twitter video)

वडिलांनी चिमुकल्याला घेऊन धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी, कल्याणमधील घटनेचा LIVE VIDEO समोर (Photo: Screengrab from twitter video)

Kalyan News: कल्याणजवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एका वडिलांनी आपल्या मुलासोबत ट्रेनसमोर उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Mumbai Central Railway updates)

    कल्याण, 18 फेब्रुवारी : ठाणे जिल्ह्यातील (Thane district) कल्याण येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलासोबत धावत्या एक्सप्रेससमोर उडी (Father jumps Infront of train with his son) मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा वर्षांचा चिमुकला बचावला आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद (caught in CCTV) झाली आहे. कल्याण जवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. (Ullhasnagar father jumps infront of express train with his 6 year old child at vitthalwadi railway station Kalyan) मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचं नाव प्रमोद आंधळे असं आहे. प्रमोद आंधळे हे उल्हासनगर येथील शांतीनगर परिसरात राहत होते. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात त्यांनी आपल्या मुलाला घेऊन ट्रेनसमोर उडी घेतली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव आलेल्या डेक्कन एक्सप्रेससमोर प्रमोद यांनी मुलासोबत उडी घेतली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. वाचा : VIDEO"बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही"अमोल कोल्हेंना मित्राच्या आईने दिली तंबी मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला भरधाव ट्रेनसमोर उडी घेतल्याने प्रमोद आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने या अपघातातून त्यांचा सहा वर्षीय मुलगा बचावला आहे. मुलाला सोबत घेऊन प्रमोद यांनी प्लॅटफॉर्मवरुन उडी मारली. मात्र, यावेळी मुलगा त्यांच्या हातातून निसटला आणि शेजारी पडला. त्यामुळे यातून मुलगा बचावला आहे. ही संपूर्ण घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मृतक प्रमोद यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. उल्हानगरमधील शांतीनगर परिसरात ते राहतात. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाचा : जामीनावर बाहेर येताच हिंदुस्तानी भाऊला मोठा झटका, मुंबईनंतर आता... घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी प्रमोद यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. तर सहा वर्षीय मुलाला प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले. दरम्यान प्रमोद आंधळे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? त्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv footage, Kalyan, Train

    पुढील बातम्या