कल्याण लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे गड राखणार का?

कल्याणच्या जागेवर अनेक वर्षं भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील अशी लढत आहे. श्रीकांत शिंदे कल्याणची जागा राखणार का याबदद्ल सगळ्यांना उत्सुकता आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:05 PM IST

कल्याण लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे गड राखणार का?

कल्याण,15 मे : कल्याणच्या जागेवर अनेक वर्षं भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील अशी लढत आहे. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

मागच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांना यावेळी 4 लाख 40 हजार 892 मतं मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपेंना 1 लाख 90 हजार 143 मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर मनसेचे प्रमोद पाटील होते. त्यांना 1 लाख 22 हजार 349 मतं मिळाली.

कल्याण लोकसभेची जागा अनेक वर्षं भाजप - शिवसेनेकडे होती. हा मतदारसंघ जेव्हा ठाण्याचाच भाग होता त्यावेळी इथे प्रकाश परांजपे खासदार होते.

2009 मध्ये आनंद परांजपे विजयी

Loading...

2009 मध्ये आनंद परांजपे शिवसेनेकडून लढून विजयी झाले. या निवडणुकीनंतर मात्र ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. 2014 च्या निवडणुकीत आनंद परांजपेंचा पराभव झाला आणि शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आले.

वेगवेगळ्या समुदायांचे मतदार

कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ विधानसभेत शिवसेना तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. कल्याण पूर्वमध्ये अपक्ष आमदार आहेत तर डोंबिवलीमध्ये भाजप, कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना तर मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

कल्याणच्या या मतदारसंघात उत्तर भारतीय, सिंधी यासोबतच मुस्लीम मतदारांचाही समावेश आहे. त्यामुळे सगळ्याच समुदायातल्या मतदारांना आकर्षित करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो.

कल्याणमध्ये 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झालं. यावेळी मतदारांनी श्रीकांत शिंदे यांनाच कौल दिला की आणखीही काही पर्याय निवडला हे 23 मे ला कळू शकेल.

==============================================================================

VIDEO : प्रियांकांच्या सभेआधी आलं वादळ, मंडपाची झाली अशी अवस्था

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...