Home /News /maharashtra /

कल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने

कल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने

फलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 26 डिसेंबर: कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.  कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक उशिराने सुरू आहे. फलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे.  यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या  बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा बिघाड ठीक झाल्यावर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येईल.  गेल्या काही दिवसात लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रसंग वाढले आहेत. हार्बल लाईनवर रूळ तुटल्याने काही दिवसांपूर्वी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर धुक्यामुळे काही दिवस मध्य  रेल्वेवरील लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. आता तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सततच्या या समस्यांवर आता सरकार काय उपाय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Kalyan, Maharashtra, कर्जत, कल्याण, महाराष्ट्र, लोकल

पुढील बातम्या