कल्याण, 4 मार्च : कल्याणमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकातील पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला झारखंडच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 20 मिनिटात फोटोच्या आधारे आरोपी मिठू रॉय याला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा-विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर त्यानं केला बलात्कार आणि पकडले जाण्याच्या भयानं जीवही घेतला
घटनेच्या 24 दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांमुळे हे शक्य झाले असून या गुन्ह्यात आरोपीला पकडून त्याच्या साथीदारांचा छडा लावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सुरेश डांबरे, दीपक सरोदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सत्कार करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.