मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमचं 3 लाख रुपये लाईट बिल कमी करता मग सर्व सामन्यांचं का नाही, भाजप आमदाराचा सवाल

आमचं 3 लाख रुपये लाईट बिल कमी करता मग सर्व सामन्यांचं का नाही, भाजप आमदाराचा सवाल

 आमदाराच्या कार्यालायचे बिल होतं म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्य जनतेचं काय....

आमदाराच्या कार्यालायचे बिल होतं म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्य जनतेचं काय....

आमदाराच्या कार्यालायचे बिल होतं म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्य जनतेचं काय....

कल्याण, 1 सप्टेंबर: राज्यातील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. हजारो आणि लाखो रुपयांची लाईट बिल पाठवून महावितरणनं नागरिकांचं जगणे असाह्य केलं आहे. चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील कर्मचारी कॅल्क्युलेटरवर हिशोब करून दाखवत आहेत. कंपनीकडून पाठवण्यात आलेलं बिल बरोबर असल्याचं दाखवत ग्राहकांच्या तक्रारीची बोळवण केली जात आहे. कल्याण (पूर्वे)चे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. हेही वाचा... लॉकडाऊनचं केलं संधीत रूपांतर, उच्च शिक्षित तरुणानं अशी केली लाखोंची कमाई कल्याण (पूर्वे)चे आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालय आहे. या कार्यालयाला महावितरण कंपनीनं सुमारे 5 लाख रुपयांचे लाईट बिल पाठवलं होतं. इतकी मोठी रक्कम पाहून केबल कार्यालयातील कर्मचाऱ्यानं तातडीनं महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. नंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानं लाईट बिल तब्बल 3 लाख रुपयांनी कमी करून दिलं. आमदाराच्या कार्यालायचे बिल होतं म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्य जनतेचं काय, असा सवाल आता खुद्द आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा...प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं घेतला मोठा निर्णय आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं की, सर्वसामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा बिले महावितरणकडून देण्यात आली आहेत. याबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांची बोळवण होते. महावितरणच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण आणणे गरजेचं आहे. आमच्यासारखं हजारो नागरिकांना चुकीची बिले महावितरणकडून पाठवण्यात आल्याचाही आरोप आमदार गणपत गायकवाढ यांनी केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या