कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, आढळले आणखी 13 रुग्ण!

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, आढळले आणखी 13 रुग्ण!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 156 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

  • Share this:

कल्याण, 29 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तर मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत चालले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 156 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत आज आणखी 13 नवे रुग्ण आढळले आहे. डोंबिवली परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.  यात कोरोनाबाधित रुग्‍णांचा संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा - पुण्यात महिलेच्या मृत्यूनंतर घडली भयंकर चूक आणि अख्खा कुटुंबाचा जीव आला धोक्यात

तसंच मुंबईत काम करणारे  ईसिजी टेक्नीशियन, शासकीय रुग्णालयातील परिचारिका, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,  फार्मा. कंपनीतील कर्मचारी आणि शासकीय कार्यालयातील कामगारांचा समावेश आहे.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 156 रुग्ण आढळले. 156 रुग्णांपैकी 46 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 107 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा - कोरोना योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लढला; लेक करणारं त्यांचं अधूरं स्वप्न पूर्ण

तर आज कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील गोळवली गावात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  या महिलेच्या घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये 3 जणांचा बळी गेला आहे.

14 नव्हे आता 28 दिवस क्वारंटाइन

कोरोना साथीचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी महापालिका क्षेत्रात विविध स्‍तरावर युद्धपातळीवर प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व्‍यक्तीच्‍या संपर्कात आलेल्‍या  व्‍यक्तींचे नमुने गोळा करुन त्‍यांना खबरदारी म्‍हणून पुढील 14 दिवस क्वारंटाइन करण्‍यात येत आहे.

हेही वाचा -पुण्यात महिलेच्या मृत्यूनंतर घडली भयंकर चूक आणि अख्खा कुटुंबाचा जीव आला धोक्यात

परंतु, काही रुग्‍णांना 14 दिवसानंतरही लक्षणे आढळून आलेली आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे असे रुग्‍ण 14 दिवसानंतर इतर रुग्‍णांच्‍या संपर्कात येवून इतरांनाही बाधित करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे यापुढे कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती तसंच प्रवास इतिहास असणाऱ्या प्रवाशांचा क्वारंटाइन कालावधी 14 दिवसावरुन 28 दिवसांपर्यंत करण्‍यात आला आहे.  त्‍याअन्‍वये सदर रुग्‍णांना, रुग्‍णाच्‍या संपर्कात आल्‍यापासून  किंवा बाधित भागातून प्रवास केल्‍यापासून 28 दिवसापर्यंत क्वारंटाइन करण्‍यात येणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 29, 2020, 4:21 PM IST

ताज्या बातम्या