कल्याण-डोंबिवलीत कोरोना हॉटस्पॉट जाहीर, 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील

कल्याण-डोंबिवलीत कोरोना हॉटस्पॉट जाहीर, 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील

कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता महापालिकेनं 10 कोरोना हॉटस्पॉट जाहीर केले आहेत.

  • Share this:

कल्याण, 19 एप्रिल:कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता महापालिकेनं 10 कोरोना हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. सोबतच महापालिकेच्या 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

केडीएमसीनं जाहीर केलेल्या या 10 हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. हे हॉटस्पॉट महापालिकेच्या 122 पैकी २० प्रभागांमध्येच आहेत. त्यामुळे हे प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवलीत आत्तापर्यंत कोरोनाचे 73 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातले सर्वाधिक 49 रुग्ण हे डोंबिवलीतले आहेत. तर कल्याणचे 23 आणि टिटवाळा इथल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे. यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून 26 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 45 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा... आईचं दूध नवजात बाळासाठी संजीवनी, जीवघेण्या व्हायरसपासून करतं संरक्षण

कल्याण- डोंबिवलीत कुठे किती रुग्ण?

डोंबिवली (पूर्व) - 34 रुग्ण

डोंबिवली (पश्चिम) - 15 रुग्ण

कल्याण (पूर्व) - 13 रुग्ण

कल्याण (पश्चिम) - 10 रुग्ण

टिटवाळा - 1 रुग्ण

एकूण- 73

हॉट स्पॉट

- डोंबिवली पूर्व - म्हात्रे नगर, आयरे गाव, तुकाराम नगर, छेडा रोड

- डोंबिवली पश्चिम - रेतीबंदर रोड, टेल्कोस वाडी

- कल्याण पूर्व - चिंचपाडा, भगवान नगर

- कल्याण पश्चिम - खडकपाडा, वायले नगर

हेही वाचा..पुणेकरांसाठी पुढील 8 दिवस महत्त्वाचे, अजित पवारांनी दिले कठोर निर्देश

केडीएमसीमधील 20 संवेदनशील प्रभाग?

प्रभाग क्र. 3 - गांधारे

प्रभाग क्र. 10 - टिटवाळा गणेश मंदिर

प्रभाग क्र. 15 - शहाड

प्रभाग क्र. 23 - फ्लॉवर व्हॅली

प्रभाग क्र. 27 - चिकणघर गावठाण

प्रभाग क्र. 50 - गरिबाचा वाडा

प्रभाग क्र. 54 - ठाकूर वाडी

प्रभाग क्र. 56 - गावदेवी मंदिर नवागाव

प्रभाग क्र. 63 - कोपर रोड

प्रभाग क्र. 64 - जुनी डोंबिवली

प्रभाग क्र. 65 - कोपर गाव

प्रभाग क्र.67 - म्हात्रे नगर

प्रभाग क्र. 71 - सारस्वत कॉलनी

प्रभाग क्र. 78 - तुकाराम नगर

प्रभाग क्र. 82 - अंबिका नगर

प्रभाग क्र. 95 - नेहरू नगर

प्रभाग क्र. 96 - जाईबाई विद्यामंदिर साईनगर

प्रभाग क्र. 98 - विजय नगर

प्रभाग क्र. 100 - तिसगाव गावठाण

प्रभाग क्र. 111 - सागांव सोनारपाडा

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 19, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या