Home /News /maharashtra /

बॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक

बॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक

नेतीवली चौकात लावलेल्या या बॅनरची सध्या कल्याण शहरात मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर तर हा बॅनर तुफान व्हायरल झालाय.

कल्याण, 20 एप्रिल : बॅनरवर भाऊगर्दी प्रत्येक गल्लीबोळात पाहण्यास मिळते. अशाच भाऊगर्दी 'भाऊ भाऊं'नी हजेरी लावून भाईलोकांना चांगलीच चपराक लगावलीये. त्याचं झालं असं की,  कल्याण शहरात सध्या एका बॅनरची जोरात चर्चा सुरू आहे. हा बॅनर कुठल्याही राजकीय नेता किंवा पुढाऱ्याचा नाहीये, तर चक्क एका कुत्र्याच्या वाढदिवसाचा आहे. कल्याणच्या नेतिवली चौकात लावलेल्या बॅनरवर 'मॅक्स भाई'ला शुभेच्छा देणारे शुभेच्छुकही तितकेच खास आहेत. ज्यात ज्येष्ठ उद्योगपती टायसन भाई, युवा नेता डेंजर भाई, उद्योगपती प्रिन्स भाई, समाजसेवक मेरू भाई, डॉग सेलचे अध्यक्ष सॅम भाई, समाजसेविका कुमारी स्वीटी ताई आणि युवा अध्यक्ष ब्रुनो भाई यांचा समावेश आहे. नेतीवली चौकात लावलेल्या या बॅनरची सध्या कल्याण शहरात मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर तर हा बॅनर तुफान व्हायरल झालाय. कल्याण शहरात सध्या बॅनरबाजीला प्रचंड उत आलाय. गल्लोगल्ली रोज नवनवीन दादा, भाई जन्माला येतायत. आणि त्यांच्याकडून मोठी बॅनरबाजी करून शहर विद्रुप केलं जातंय. आशा लोकांना उपहासात्मक संदेश देण्यासाठी हे बॅनर आपण लावल्याचं नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सांगितलं. शिवाय त्यांच्या मॅक्स भाई या लाडक्या कुत्र्याचा आज खरोखर वाढदिवस असल्याचं गुपितही त्यांनी उघड केलं.
First published:

Tags: Banner, Kalyan, Kalyan hording, कल्याण, बॅनर, मॅक्स भाई

पुढील बातम्या