मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kalyan: चुकीचे औषध दिल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

Kalyan: चुकीचे औषध दिल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

कल्याण: चुकीचे औषध दिल्याने दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू? डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: चुकीचे औषध दिल्याने दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू? डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

Kalyan Doctor booked after one and half year girl died: कल्याणमधील डॉक्टरने चुकीचे औषध दिल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण, 10 डिसेंबर : कल्याण (Kalyan)मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय चिमुकलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू (one and half year old girl died) झाला होता. हा मृत्यू डॉक्टराने चुकीचे उपचार केल्याने झाल्याचा आरोप चिमुकलीच्या आईने केला आहे. आता या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉक्टर एस. ए. आलम आणि त्याचा सहकारी मोहम्मद ताज अन्सारीच्या विरोधात कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Doctor booked after death of girl  allegedly prescribed wrong medicine in Kalyan)

पप्पू सहानी आणि मुन्नी सहानी हे आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत कल्याण पूर्व कचोरे परिसरात राहतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला ताप आल्याने पप्पू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे दोघे मुलीला घेऊन सूचक नाका परिसरात असलेल्या हसन क्लिनिकमध्ये गेले. त्यावेळी डॉक्टरांनी मुलीला काही औषध दिली. मात्र औषध घेतल्यानंतर मुलीला जास्त त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटूंबियांना केला आहे.

वाचा : "Sorry बाबा" म्हणत आत्महत्येचा प्रयत्न, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

डॉक्टरांनी आपल्या मुलीला चुकीची औषधे दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप मृत मुलींच्या कुटूंबियांनी केला. याप्रकरणी कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्य दाखविले नाही आणि गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मुलीच्या कुटूंबियांनी केला. त्यानंतर या कुटूंबियांनी कल्याण न्यायालयात याप्रकरणी दादा मागितली.

अखेर न्यायालयाने कल्याण कोळशेवाडी पोलिसांना संबंधित डॉक्टरवर 304 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कल्याण कोलशेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर एस. ए आलम आणि मोहमद ताज अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मोहमद अन्सारी हा एस. ए. अमल यांच्या लेटरहेडचा वापर करत रुग्णाला चुकीचे औषध देत होता. तसेच मुन्नी सहानी यांच्या मुलीला चुकीचे उपचार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाचा : क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण

आता या तक्रारीनुसार गुन्हा केला असून तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचं चिमुकलीची आई मुन्नी सहानी यांनी म्हटलं आहे, त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी सहानी यांनी केली आहे. तर या प्रकरणी तपास सुरू असून योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे.

First published:

Tags: Crime, Kalyan